Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

गोशाळा, वृद्धाश्रमाला वारकऱ्यांची मदत

पुणे : रविवार पेठेतील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि तनपुरे बाबा भजनी मंडळ यांच्या वतीने पाथर्डी येथील नंदिनी गोशाळेला मदत करण्यात आली. गुरुवर्य गोविंद बाबा तनपुरे महाराज यांच्या ८७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या सांगतेचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. संत तुकाराम महाराज यांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत दगडे यांनी दिली.

वारकरी संप्रदायात भजन कीर्तन सेवा मानली जाते. मात्र ईश्वरसेवेबरोबरच मानव सेवा करण्याचा वसा या दोन्ही संस्थांनी घेतला आहे. त्यानिमित्त अनेक सामाजिक विधायक उपक्रम राबवले जातात. त्याचाच भाग म्हणून शाळेला मदत करण्यात आली. तसेच निवारा वृद्धाश्रमाला, अनिकेत दिव्यांग संस्थेलाही मदत देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading