Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

सी एस आर फंडातून जिल्हा परिषद नाझरे सुपे शाळेला विध्यार्थी उपयोगी साहित्याचे हस्तांतरण

सासवड  :नामांकित कल्याणी टेक्नोफोर्स लि. पुणे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सी एस आर निधीअंतर्गत इनमेंट टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रा. लि. जेजुरी तर्फे जिल्हा परिषद शाळा नाझरे सुपे येथे विद्यार्थी उपयोगी साहित्याचे हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम पार पडला

नामांकित कल्याणी टेक्नोफोर्स लि कंपनी विविध समाजोपयोगी क्षेत्रात मोलाचं कार्य करीत असून क्रिडा ,दारिद्र्य निर्मूलन ,कला व बालपणापासून मुलांची गुणवत्ता वाढावी लहानपणापासून मुलांना अनेक तंत्रज्ञान युक्त बाबी पाहायला मिळून त्यांचा योग्य वापर शालेय स्तरावर झाल्यास भविष्यात नक्कीच आपल्याला डॉक्टर ,इंजिनियर ,शास्रज्ञ असे विद्यार्थी मिळून देश महासत्ता करण्यासाठी आपला हातभार लागावा हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आज या साहित्याचे वाटप केलं आहे
गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशा प्रकारची कायमस्वरूपी मदत आणण्याचा माझा सर्वोतोपरी प्रयत्न राहणार असल्याची माहिती
कल्याणी टेक्नोफोर्जचे आय आर & लीगल इंचार्जे श्री. हरिदास कापरे यांनी दिली
नाझरे सुपे जिल्हा परिषद शाळेला इ टॉयलेटचे 1 युनिट ,शु रॅक 12 युनिट, बुक रॅक 1 युनिट ,वॉटर फिल्टर 1 युनिट व टीव्ही स्क्रिन 1 युनिटचे हस्तांतरण करण्यात आले
सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गावातील लोकांनी उपस्थिती लावून या कामाचा गौरव केला
जिल्हा परिषद शाळा नाझरे सुपे येथील मुलांना मिळत असलेल्या आधुनिक साहित्याबद्दल मुलांना देखील आनंद झाला यावेळी शाळेतील मुले ,पालक ,शिक्षक व गावातील नागरिकांनी याबद्दल या कामाची स्तुती करून भविष्यात गावाला अधिक आत्मनिर्भर बनण्यासाठी आशा बाबींची आवश्यकता असल्याची माहिती दिली
याप्रसंगी कार्यक्रमाला मकरंद कोटलवार – सी एच आर ओ,  अनिल शिनकर – बी यु हेड, महेश कांबळे – प्लांट हेड,  हरिदास कापरे – आय आर & लिगल, आरती देसाई – एच आर, राहुल सावंत – सी एस आर,शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सतिश कापरे, काळाने सर,माजी चेअरमन विनायक कापरे ,तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर कापरे ,पांडुरंग कापरे , व मोठ्या प्रमाणात शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply