Tuesday, July 28, 2026
Latest NewsPUNE

लव्हेबल पुणेकर थिरकले ए.आर.-आर.डीं.च्या गाण्यांवर

पुणे : सिनेसंगीत म्हटले की आठवतात अनेक दिग्गज गायक आणि संगीतकार. यातील आर.डी. (पंचम) हे काळाच्या पुढचा विचार करणारे तर ए.आर. म्हणजे काळाचे बंधन नसलेले संगीतकार. या दोन संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली आणि रसिकांच्या मनात आजही घर करून असलेल्या अनेक रोमहर्षक गीतांनी पुणेकरांची सायंकाळ लव्हली आणि नॉस्टॅलजिक ठरली.

निमित्त होते ते व्हॅलेंटाईन डेचे. सूरपालवीसिनेमा गली आणि पूना गेस्ट हाऊस यांच्या संयुक्त सहकार्याने शनिवारी (दि. 18) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात लव्हेबल ए.आर.-आर.डी. या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आर.डी. (पंचम) आणि ए.आर. यांनी संगीतबद्ध केलेली सत्तर आणि नव्वदच्या दशकातील गाजलेली चित्रपट गीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली.

व्हॅलेंटाईन डे म्हटले कीसगळा प्रेमाचाच मामला. या प्रेमाला न वयाचे बंधन ना कुठला भेदाभेद. प्रत्येकाच्या मनात खोलवर प्रेमाचा अंकुर दडलेला असतो तो नव्याने फुलला लव्हली लव्हली गीतांमुळे.

या कार्यक्रमाची सुरुवातही किशोर सरपोतदार यांच्या हस्ते क्लॅप देऊन हटके झाली. तुम बीन जाऊ कहाँहमे तुमसे प्यार कितनादिल है छोटासाआवारा भवरेबचना ए हसिनोतेरे बिना जिंदगीसेक्या हुआ तेरा वादारंगीला रेहम्मा हम्माएक चतुर नारछैंय्या छैंया अशा एकाहून एक लव्हेबल गीतांचा आनंद पुणेकरांनी लुटला. या सगळ्यावर कडी केली ती अनिल करमरकर यांनी सॅक्सोफोनवर सादर केलेल्या गुलाबी आँखे या गीताने. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या प्रेमाच्या मामल्यात अनेक तरुणांसह ज्येष्ठांचीही पावले थिरकली.

या कार्यक्रमाचे आयोजन सिनेमा गलीचे गुरुतत्त सोनसुरकर व वृषाली अंबर्डेकर यांनी केले होते. संकल्पना आणि दिग्दर्शन संजय हिवराळे यांचे तर संयोजन पल्लवी पत्की-ढोले यांचे होते. सदाबहार गीते पल्लवी पत्की-ढोलेरवींद्र खोमणेकल्याणी देशपांडेरफी हबीब आणि संतोष गायकवाड यांनी प्रसिद्ध कलाकारांच्या आवाजात सादर केली. संजय हिवराळेमिहिर भडकमकरअमन सय्यदजितेंद्र साळवीअभिजित भदेहर्षद गणबोटेमुकेश देडियालिजेजसचिन वाघमारे आणि अनिल करमरकर यांच्या वाद्यवृंदाने कार्यक्रमात रंग भरले. खुमासदार निवेदन आर. जे. प्रेषित यांनी केले तर स्वर आलापने कोरसची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे संयोजन किशोर सरपोतदार यांनी केले. अजित कुमठेकर कार्यक्रमाचे समन्वयक होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading