प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
पुणे : प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक ,प्राथमिक व माध्यमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम व बक्षीस वितरण कार्यक्रम अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे नियोजन शशिकला तानाजी कुंभार,महेश तानाजी कुंभार व वर्षाराणी महेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार वंदनाताई चव्हाण प्रमुख पाहुणे प्रशांत जगताप, मृणालिनी वाणी, संतोष नांगरे, रामदास साळवे होते. तसेच प्रणिता कुमावत उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग उपस्थित राहिल्या होत्या.
कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.
