सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आयोजित ‘सक्षम’ मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण
पुणे : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या स्टुडन्ट कौन्सिलतर्फे नुकतेच किवळे येथील विद्यापीठाच्या परिसरात ‘सक्षम’ या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदीवला होता. ‘डू व्हॉट इट टेक्स टू बी अँट एसएसपीयु’ हे सक्षम चे ब्रीदवाक्य होते. ह्या कार्यक्रमाचे उदघाटन विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस इंडिया टिव्ही चे वरिष्ठ संपादक दिनेश मौर्या आणि वोडाफोन इंडियाचे सायबर इंटेलिजन्स प्रमुख सिमरजित मोहांती सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते . तसेच विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिरूरकर देखील उपस्थित होत्या.
कला-क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा तसेच ओपन मार्केट ,ऑटो शो ,डीजे असे उत्साहपूर्ण या कार्यक्रमाचे स्वरूप होते सक्षममधील आंतर महाविद्यालयीन क्रीडास्पर्धेत बास्केटबॉल ,फुटबॉल,आणि बॉक्स क्रिकेट चे समावेश होता. एसएसपीयु मध्ये क्रीडाला अनन्य साधारण महत्व असून सदरील सर्व क्रीडा स्पर्धा ह्या युनिव्हर्सिटीच्या प्रशस्त मैदानात भरविण्यात आल्या होत्या. सर्व क्रीडा स्पर्धांसाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्टॅन्ड अप कॉमेडियन साहिल होराने याने आपल्या विनोदातून उपस्थितांना हसवले.

या कार्यक्रमामध्ये अल्पास बँडने आपल्या लाईव्ह बँड परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. सक्षम २०२३ चे मुख्य आकर्षण हे गली बॉइस चित्रपटातील प्रसिद्ध रॅपर एमसी अल्ताफ आणि दे व्हील हे ठरले. सक्षममध्ये विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर समूहनृत्य, सोलो नृत्य सादर केली त्याचप्रमाणे बँड वॉर, संगीतस्पर्धा, गायनस्पर्धा, एकल गायनस्पर्धा,सौंदर्यस्पर्धा आणि मिस्टर आणि मिसेस सक्षमला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना आकर्षित बक्षिसे देण्यात आली.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातील पहिली कौशल्याधारित युनिव्हर्सिटी असून विद्यार्थ्यंमधील अंगभूत कौशल्ये सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते .आम्ही ३० टक्के लेखी अभ्यासक्रम आणि ७० टक्के प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देतो यातून विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढीस लागते . सक्षम सारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना कार्यक्रमांचे नियोजन,अर्थव्यवहार, उत्पादन विक्री आणि विपणन आणि इतर कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होते.
