आदिवासी , भटके विमुंक्तासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर लढा उभारणार – किसन चव्हाण
पुणे : भटक्या विमुक्त व आदिवासी समाजाचे जातीच्या दाखल्याचे विषय ,गायरान जमीन ,घरकुल ,शबरी घरकुल योजना ,पारधी समाजाला गुन्हेगार म्हणून होत असणारी कुचंबणा यासारखे अनेक प्रश्न घेऊन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर लढा उभारणार असल्याचे वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व आदिवासी भटके विमुक्त समाजाचे समन्वयक किसन चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद जाहीर केले .
प्रा. किसन चव्हाण पुढे म्हणाले की ,सामाजिक, आर्थिक, राजकीय शैक्षणिक अधिकारा पासून कोसो दूर असलेल्या आदिवासी व भटक्या विमुक्त या वंचित समुहाला सत्तेत वाटेकरी करण्याचा संकल्प खा. प्रकाश उर्फ बाळासाहब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून केला आहे. कधी नव्हे तर या समुद्यातील लहान लहान जाती ना राजकीय व सामाजिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी बाळासाहेब प्रयत्नशील आहेत,
आदिवासी भटक्या विमुक्तवर अनंत लहान साहन अडचणी आहेत, गुन्हेगार जात म्हणून होणारी कूचबना, सामाजिक व राजकीय मुस्कटदाबी, प्रशासकीय हेळसांड, ह्या सर्व गोष्टी मोडीत काढण्यासाठी, गायरान जमिनीचे पट्टे, घरकुल, जातप्रमाण पत्र, वैधता प्रमाणपत्र, शबरी घरकुल योजना या सर्व बाबी वर वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी, भटक्या विमुक्त समन्वय समिती च्या माध्यमातून राज्य भर लढा उभारण्यात येइल. दीड कोटी आदिवासी व भटका समाज जर बाळासाहेबच्या पाठीशी ठाम पणे जर उभा राहिला तर महाराष्ट्र ची सत्ता वंचितच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही, सत्ता असेल तर कोणासमोर हात पसरण्याची वेळ आदिवासी व भटक्या विमुक्त आणि वंचित बांधवावर येणार नाही असे प्रतिपादन मा. किसन चव्हाण यांनी आपल्या भाषणातून भटक्या विमुक्त व आदिवासी समूहाचे संचित करण्यासाठी मा.बाळासाहेब यांनी सर्व घटकांना लोकसभा, विधानसभेच्या उमेदवाऱ्या दिल्या व देशात एक आदर्श निर्माण केला आणि येणाऱ्या काळात सुद्धा आदरणीय बाळासाहेबच न्याय देऊ शकतात. असे मत व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेस प्रा.किसन चव्हाण ,विष्णू जाधव ,पुणे अध्यक्ष कमलेश उकिरंडे ,व प्रमुख वंचित आघाडीचे नेते उपस्थित होते .
