Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर . : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.

 शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी यावेळी भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. शाह आणि फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे, प्रा.आगलावे, विलास गजघाटे, भंते दीपंकर आदींनी श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading