Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Shivsena – निवडणूक आयोगाचा ठाकरेंना धक्का; धनुष्यबाण शिंदेगटाला

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोपविण्याचा निर्णय आज, शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत दिलेल्या निर्णयांचा आढावा घेतल्यास शिवसेनेबाबतचा निर्णय हा ऐतिहासिकच ठरला आहे.

राज्याच्या राजकारणात आत्तापर्यंतची सर्वात मोठी घडामोड घडली आहे, केंद्रीय निवडणुक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला दिलं आहे. निवडणूक आयागोचा हा निर्णय ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का आहे. पक्षफुटीच्या अनेक प्रकरणांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस, स्वाभिमानी आणि लोजपसह अनेक पक्षांचे चिन्ह गोठवल्याचा इतिहास आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्षाची सूत्रे आणि धनुष्यबाण चिन्ह गेले.

एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत बाहेर पडत भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले, यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आपला दावा केला, खरी शिवसेना आपलीच असा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडून केला जात होता.  याप्रकरणी सुप्रीम कोर्टात लढाई सुरु आहे. मात्र आज अखेर केंद्रीय निवडणुक आयोगाने याबाबत आपला निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव आता शिंदे गटाचं असणार आहे. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी राजकारणातील सर्वात मोठा धक्का आहे.

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading