Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना शिंदेंची होताचं राज ठाकरे यांना आठवले बाळासाहेब

मुंबई : शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला धनुष्यबाण हे चिन्ह आणि मूळ शिवसेना नाव देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आयोगाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील व्हिडिओ पोस्ट करत “बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….” असे ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप घडला. शिवसेनेतील चाळीस आमदार तसेच 13 खासदारांनी शिंदे यांची साथ दिली. सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाच्या कोर्टात हा संपूर्ण वाद गेला होता. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज निर्णय देण्यात आला आहे. शिंदे यांच्याकडे बहुमत असल्याने धनुष्यबाण तसेच मूळ शिवसेना हे नाव देण्यात येत असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आल आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading