Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

फोरसाईट कॉमर्स महाविद्यालय येथे मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन

पुणे : कसबापेठ व चिंचवड मतदार संघात व्यापक मतदान जागृती अंतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि स्वराज्य वैद्यकीय संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने रास्ता पेठेतील फोरसाईट कॉमर्स महाविद्यालय येथे मतदार जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.

यावेळी स्वराज्य टास्क फोर्सचे संचालक दीपक कारकर, फोरसाईट कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य, सचिव शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मतदान आपला हक्क असून सर्वांनी मतदान करावे. आपल्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्याविषयी प्रवृत करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी विद्यार्थ्यांना केले. आकांक्षा गुंड, तुषार जोंधळे व त्यांच्या चमुने मतदान जनजागृती विषयी पथनाट्याचे सादरीकरण केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading