Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सेवा सहयोग संस्थेचा किशोरी विकास प्रकल्प दशकपूर्ती कार्यक्रम रविवारी

पुणे : २०२३च्या जानेवारीमध्ये सेवा सहयोगच्या किशोरी विकास प्रकल्पाला १० वर्षे पूर्ण झाली. या १० वर्षात खूप मजल गाठली पण अजून खूप काही करायचे बाकी आहे. वर्धापनदिन हा जसा आत्तापर्यंत केलेला प्रवास साजरा करायचा दिवस असतो तसाच पुढे जायची दिशा ठरविणारा क्षण पण असतो.

१० वर्षांपूर्वी, सेवा सहयोगच्या कार्यकर्त्यांना जाणवले की वय वर्षे १२ ते १८ पर्यंत होणार्‍या शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांना सुयोग्य पद्धतीने सामोरे जाण्यासाठी किशोरींच्या सोबत मैत्रिणीच्या नात्याने उभे राहणे खूप गरजेचे आहे.या विचारांना अनुलक्षून किशोरी विकास प्रकल्पाची निर्मिती झाली. या उपक्रमातील खेळ,आरोग्य, आहार,व्यक्तिमत्व विकास, आणि लैंगिक शिक्षण आधारित सत्र, मुक्तसंवाद,बौद्धिक चर्चा, मुलींना दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरतात.‘किशोरी विकास’ प्रकल्पाच्या अभ्यासक्रमातून एक सक्षम,सजग,तेजस्वी, तरुणी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

आज, किशोरी विकास प्रकल्पाच्या १० व्या वर्धापन वर्षी मागे वळून तर बघायचे आहेच, पण अजून खूप वाटचाल करायची आहे याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे संस्थात्मक उद्देश, धोरणे याचा फेर-विचारही करायला हवा. याच सर्व कारणांसाठी किशोरी विकास प्रकल्पाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतोय अशी माहिती कार्यक्रमाच्या आणि किशोरी विकास प्रकल्पाच्या प्रमुख राधिका कोंडेजकर,मनीषा जोशी, शिल्पा राजहंस यांनी दिली.हा कार्यक्रम कर्वेनगर येथील कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम सभागृहात रविवार दिनांक १९ रोजी सकाळी दहा ते दुपारी ४ या वेळेमध्ये होणार आहे.
ह्या कार्यक्रमात १५० सामाजिक संस्था, ७५ CSR प्रतिनिधि ५०० किशोरी आणि १०० सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील.

या वर्धापन दिन समारंभाची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत
◆ किशोरी विकास प्रकल्पाचा आजपर्यंतचा प्रवास आणि आजमितीला चालू असलेले काम याचा आढावा
◆ सेवा सहयोगच्या विविध प्रकल्पांचे किशोरी विकास मध्ये असलेले योगदान आणि प्रदर्शनी
◆ किशोरी विकास प्रकल्पाची पुढील शाश्वत वाटचाल ठरविण्याच्या दृष्टीने CSR व इतर सामाजिक संस्थांबरोबर चर्चा
◆ महाराष्ट्रातील १०, विविध जिल्ह्यातील सामाजिक संस्थांना, त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये, किशोरी विकास प्रकल्प सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व इतर सर्व मदत देण्याच्या दृष्टीने आखणी होईल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading