हवेली तहसील कार्यालयातील तत्काळ उतारे मिळण्याची मशीन बंद
- शेतकरी, विद्यार्थी यांना नाहक त्रासमशीन तत्काळ सुरू करा – अतुल बहुले
पुणे : .हवेली तहसील कार्यालयातील तत्काळ उतारे देणारी मशीन गेल्या काही दिवसापासून बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .त्यामुळे तत्काळ मशीन चालू करा अशी मागणी वंचित आघाडीचे अतुल बहुले यांनी केली आहे .जिल्हाधिकारी यांचे प्रशासनातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाकडे दुर्लक्ष.
गेले ६/७ दिवस झाले हवेलीचे तहसिलदार यांनी बेकायदेशीर रित्या जुने ७/१२, उतारे व इतर महत्वाची कागदपत्रे देण्याची मशीन बंद ठेवली आहे .
त्यामुळे विद्यार्थी , शेतकरी, व नागरिकांना जातपडताळणी साठी व ईतर कोर्ट केसेसचा कामकाजासाठी लागणारी कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. तरी आपल्या जिल्हायचे जिल्हाधिकारी यांना याची महिती नाही. याचाच अर्थ जिल्हाधिकार्यांचे प्रशासनातील कामकाजाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
नुकतेच जिल्हाधिकारी यांचा निवडणूक संदर्भात चांगली कामगिरी केल्याबद्दल भारत देशाच्या राष्ट्रपती यांनी त्यांचा सत्कार व सन्मान करून गौरव ही केला आहे.तरी त्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावे अशी मागणी बहुले यांनी केली आहे .
