Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

व्हॅलेंटाईन डे नाही, मातृ-पितृ दिन साजरा

पुणे : भारतीय संस्कृतीत अनेक चांगले सण, उत्सव आहेत. यामध्ये आई-वडिल, गुरू यांना आदर दिला आहे. परंतु काळाच्या ओघात तरुणाईला आपल्या संस्कृतीचा विसर पडत आहे. व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस तरुणाई उत्साहात साजरी करते, परंतु माता पित्यांचा सन्मान देखील करायला हवा, यासाठी व्हॅलेंटाईन डे ऐवजी पुण्यात मातृ-पितृ दिन व पूजन उत्साहात करण्यात आले.

श्री योग वेदांत सेवा समिती पुणे यांच्यावतीने अखिल मंडई मंडळाच्या प्रांगणात मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साध्वी रेखा बहन यांच्या गीता भागवत सत्संगाचे आयोजन देखील करण्यात आले होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, समिति चे अध्यक्ष चेतन चरवड, सचिव राकेश श्रीवास्तव, मीडिया प्रमुख सचिन परदेशी व इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

साध्वी रेखा बहन म्हणाल्या, व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करायला हवा. शाळेमध्ये घराघरांमध्ये आणि प्रत्येक माणसापर्यंत हा संदेश जायला पाहिजे. आपला दिवसच आपल्या आई-वडिलांपासून चालू होतो, हीच आपली संस्कृती आहे. काळ बदलतो तसे काळासोबत अनेक गोष्टी बदलतात, परंतु आपले संस्कार आपण विसरता कामा नये.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, भारतीय लोक कोणताही विचार न करता अंधानुकरण करतात. अनेकदा याचे दुष्परिणाम देखील होतात. भारत देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा मातृ पितृ दिन साजरा करायला पाहिजे. आई वडिलांना परमेश्वर मानून त्यांची पूजा करणे, ही भारत देशाची संस्कृती आहे. भारत देशातील चांगल्या प्रथा पुढे नेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

चेतन चरवड म्हणाले, हा उपक्रम समिती सॅन २००५ पासून साजरा करत आहे. आज संपूर्ण भारतामध्ये आणि 1१५६ देशांमध्ये मातृ पितृ दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येकाने याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading