Thursday, October 29, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

BBC : दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीसीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांचे फोनही ताब्यात घेण्यात आले असून या छापेमारीत ५० हून अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी बीसीसीने द इंडिया क्वेशन (The India Question) नावाचा एक माहितीपट प्रसारित केला होता. गुजरातमध्ये सन २००२ ला दंगल उसळली. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. दंगल घडली तेव्हा मोदी यांची काय भूमिका होती यावर या डॉक्युमेंटरीमध्ये भाष्य करण्यात आले आहे. सोशल मिडिया व ऑनलाईन वाहिन्यांवर ही डॉक्युमेंटरी प्रसारीत करण्यात आली होती. मात्र, देशाची प्रतिमा मलीन होत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली. देशातील बहुतांश महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. त्यावरुन वादही झाला.

दरम्यान, मुंबईतील कार्यालयातही छापे मारण्यात आले आहेत. बांद्रा कुर्ला येथील कार्यालयात आयकर विभागाचे पथक दाखल झाले असून तक्रारींचा तपास केल्यानंतर सर्व्हे अॅक्शन घेण्यात आली असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. ही कारवाई प्राथमिक स्तरावरील असल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. परंतु, बीसीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात माहितीपट प्रसारित केल्यानेच ही सूडबुद्धीने कारवाई केली असल्याची टीका केली जात आहे.

Leave a Reply