राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गणेशोत्सव देखावे स्पर्धा अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न
पुणे:पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव उत्कृष्ट देखावे स्पर्धा गौरी सजावट स्पर्धा व सेल्फी विथ नवदुर्गा स्पर्धा या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजितदादा पवार म्हणाले की , “गणेशोत्सव हि पुण्याची ओळख आहे . आज संपूर्ण जगभरात साजरा होणारा गणेशोत्सव सर्वप्रथम पुण्यातून साजरा झाला होता. आपल्या पुण्यनगरीची संस्कृती जपणारे विविध गणेशोत्सव मंडळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दरवर्षी राबवत असणारा उत्कृष्ट देखावे स्पर्धा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, या पुढील काळात देखील निरंतर सुरू राहावा, अशी माझी देखील इच्छा आहे. गणेशोत्सवाचे दिवसेंदिवस होत असलेले व्यापक स्वरूप हे पुण्यनगरीच्या सांस्कृतिक व पर्यटन विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या होत असलेल्या बदलांचा स्वीकार करत, याला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करेल, असा शब्द मी या निमित्ताने देऊ इच्छितो.
दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यनगरीतील गणेशोत्सव उत्साहात साजरा करत विविध सामाजिक उपयोगी संदेश देणारे देखावे उभे करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने दरवर्षी बक्षीस दिले जातात. यावर्षी देखील विविध सामाजिक उपक्रमांवरील देखाव्यांना बक्षीसे देण्यात आली. यात पुणे शहर कसबा विधानसभेतील जय जवान मित्र मंडळ, नाना पेठ, पुणे यांच्या “सामाजिक” या जिवंत देखाव्याने प्रथम क्रमांक मिळवला तर नवजवान मित्र मंडळ, सदाशिव पेठ यांनी (ऐतिहासिक) जिवंत देखावा ३५ कलाकार असणारा परिणामकारक देखावा सादर केला यास द्वितीय क्रमांक मिळाला, संगम तरुण मित्र मंडळ, कोथरूड यांनी साकारलेल्या अफजल खानाचा वध (जिवंत देखावा) याने तृतीय क्रमांक पटकावला.गवळीवाडा तरुण मंडळ (खडकी) व श्रीकृष्ण मंडळ (डेक्कन चौक) यांनी अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे संयोजन शहराघ्यक्ष प्रशांत जगताप व निवूत्ती बांदल यांनी केले होते
सदर कार्यक्रमास आमदार चेतन तुपे आमदार निलेश लंके ,मा. आ. अशोक टेकवडे , प्रा.दिगंबर दुर्गाडे , प्रदीप देशमुख ,संदिप बालवडकर , सुषमा सातपुते , रविन्द्र माळवदकर , योगेश ससाने , शंतनू जगदाळे ,गणेश ढोरे, कलेश्वर घुले. अमर तुपे व इतर प्रमुख उपस्थित होते.
