Sunday, June 14, 2026
Latest NewsSports

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘सेंट फिलिक्स’ला १८ सुवर्णपदके

पुणे : दो-जांग असोसिएशन आणि आर. बी. होरांगी यांच्या वतीने चंदननगर-खराडी येथे आयोजित पहिल्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सेंट फिलिक्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी १८ सुवर्ण, २६ रौप्य व २८ कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातील पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ५० पेक्षा अधिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.

सर्व विजेत्या खेळाडूंचे प्राचार्या सिस्टर जेनिफर, सिस्टर अर्सला, सिस्टर मार्था, पर्यवेक्षक सिस्टर एल्सा, सुपरवायझर लीना पॉल, पीटी शिक्षक सोनाली भोसले, रुपाली बनसोडे, रोहिणी महांकाळे यांनी अभिनंदन केले. तायक्वांदो प्रशिक्षक व आर. बी. होरांगीचे अध्यक्ष मास्टर रवींद्र भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading