Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

तिसरा अलिबाग लघुपट महोत्सव उत्साहात संपन्न

अलिबाग  – तिसरा अलिबाग लघुपट महोत्सव विविध राज्यातील लघुपट दिग्दर्शक,निर्माते आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. अलिबाग लघुपट महोत्सवामध्ये लेट्स टॉक लेटर हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर चहा बिस्किट या लघुपटासाठी प्राची चौगुले यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार अनिल चौधरी व्यंगचित्रकार धनराज गरड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. योगेश बारस्कर यांनी प्रास्ताविक केले.
उमज या लघुपटासाठी परम वाळवेकर यांना फिक्शन विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले, तर बारात हा लघुपट सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट ठरला. सीन्स ऑफ टुमारो या लघुपटासाठी अमोल अभ्यंकर यांना सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. तर रेड वाइन कलर या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचे पारितोषिक मिळाले. पारिजात हा लघुपट सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट ठरला, तर वामांगी या लघुपटासाठी मिलिंद लांजेवार यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. धीरज अधिक यांना सर्वोत्कृष्ट मराठी पटकथेचे पारितोषिक लेट्स स्टॉक लेटर या लघुपटासाठी मिळाले.
मराठी चित्रपट परिवार तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष होते. या महोत्सवामध्ये महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून अनेक लघुपट निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांनी सहभाग नोंदविला यामधून सर्वोत्कृष्ट 31 लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात आली. देवेंद्र दोडके यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे तर अक्षता पाडगावकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले.
नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करताना सुभाषचंद्र जाधव म्हणाले, हा महोत्सव आम्ही नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू केला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून भविष्यात मोठे दिग्दर्शक आणि निर्माते निश्चितच तयार होऊ शकेल. ज्या कलाकारांना पारितोषिके मिळाली नाहीत त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने काम केले पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading