परदेशात शिक्षणास जाणार्या विद्यार्थींना बार्टीमार्फत मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण
पुणे : मागील काही वर्षापासुन उच्चशिक्षणास परदेशात जाणार्या अनुसुचित जाती विद्यार्थीच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे.विषेशत;ग्रामीण भागातील विद्यार्थीची संख्या लक्षणीय आहे. परंतू त्यांना वेळेवर माहीती,मार्गदर्शन आणी अर्थिक गोष्टी न मिळाल्याने हे विद्यार्थी या संधीपासुन वर्षनुवर्ष वंचित राहात होते.त्यांना त्यांची माहीती व्हावी,विनामोबदला मार्गदर्शन व प्रशिक्षण व्हावे.यासाठी बार्टीने पुढाकार घेतला आहे.
या योजनेतुन विद्यार्थीना जास्तीत जास्त लाभ मिळावा.यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
दरवर्षाला हजारोच्या संख्येने समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थी अर्ज करत असतात.
परंतु या विद्यार्थीना अर्ज कसा करावा.त्यासाठी कोणते कागदपत्रे काढावी.परदेशात प्रवेश कसा,कोणत्या विद्यापीठात घेतला जावा.याबाबत संभ्रम असतो. गुणवत्ता असुनही विद्यार्थीना जाता येत नाही.
अशावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये सर यांच्या संकल्पनेतुन महत्वाची ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनास विद्यार्थीना लागणारे साहित्य,पुस्तक यासाठी बार्टी सहकार्य करीन.असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी म्हटले आहे
