Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

निवडणूक निरीक्षकांनी घेतला चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या कामकाजाचा आढावा

पुणे – निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल किशोर यादव यांनी थेरगांव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, पोलीस उपआयुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले
आदी उपस्थित होते.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ साठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एस. सत्यनारायण आणि अनिल किशोर यादव यांनी थेरगांव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील प्रत्येक कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी करून संबंधितांना सूचना केल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. ढोले यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक संदर्भातील केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनालाही दिली भेट

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन थेरगांव येथे निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्था आणि सुविधांचा मतमोजणीच्यादृष्टिने आढावा घेतला.

कायदा व सुव्यवस्था तसेच विविध सुविधांचे सूक्ष्म नियोजन आणि अंमलबजावणी करावी. मतदान तसेच मतमोजणी दिवशी वाहतूक व्यवस्थापनाचे योग्य पद्धतीने नियोजन करावे अशा सूचना निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading