Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

संशोधन समस्येचे योग्य निश्चितीकरण हे संशोधन पद्धतीत महत्वाचे – डॉ. यशवंत पाटील   

पुणे :  संशोधन पद्धतीमध्ये   संशोधन  समस्येचे  योग्य  निश्चितीकरण हे खूप  महत्वाचे असून संशोधनाचे  शीर्षक,त्याची उद्दिष्टे आणि गृहीतके यांच्यापरस्पर संबंधातील सुसूत्रता जपणे  गरजेचे असते असे मत वैकुंठ  मेहता राष्ट्रीय सहकारी  व्यवस्थापन संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान  केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत  पाटील  यांनी  व्यक्त केले.     
यशस्वी  एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेन्ट  सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने आयोजित करण्यात  आलेल्या  संशोधन पद्धती कार्यशाळेत  मार्गदर्शन  करताना  ते बोलत  होते.
यावेळी बोलताना विविध उदाहरणांचे दाखले देत त्यांनी साहित्य समीक्षा व साहित्य संशोधन यातील अंतर समजावून सांगितले.
यावेळी जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. चंद्रहास चव्हाण व संजय घोडावत विद्यापीठाच्या संगणक शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. बी.सुरेश कुमार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा.डॉ. शुभदा नगरकर यांनीही या संशोधन पद्धती कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

डॉ.चंद्रहास चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना संशोधनाचा आराखडा संशोधन आराखड्यातील मुद्दे,आराखड्याचे प्रकार आणि संशोधन आकृतीबंधाचे वर्गीकरण करण्यासाठी कोणते मुद्दे विचारात घ्यायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोप सत्रात डॉ. शुभदा नगरकर यांनी प्रकाशन नैतिकतेविषयी मोलाचे मार्गदर्शन करीत विविध नियतकालिकांमधून शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठीचे मार्गदर्शन केले.
प्रश्नोत्तर सत्रात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना प्रश्नांचे निरसन तीनही वक्त्यांनी केले.
या कार्यशाळेत 42 हून अधिक जण सहभागी झाले होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले,तर आभार प्रदर्शन डॉ. पुष्पराज वाघ यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading