Monday, August 10, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

तुर्की, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलमध्ये भूकंप; 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

इस्तंबूल : तुर्कित सोमवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राजधानी अंकारा, नुरदगी शहरासह १० शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, अधिका-यांनी सांगितले की, तुर्कित आतापर्यंत १११ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर ४४० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी सीरियामध्ये २२९ जणांचा मृत्यू तर ५१६ हून अधिक जखमी झाले आहेत. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कहरामनमारस प्रांतातील गझियाटेप शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून सुमारे २४ किलोमीटर खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.१७ वाजता हा भूकंप झाला.

११ मिनिटांनंतर ६.७ रिश्टर स्केलचा दुसराही भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून ९.९ किलोमीटर खाली होते. दुस-या भूकंपानंतर १९ मिनिटांनी ५.६ रिश्टर स्केलचा तिसराही भूकंप झाला. त्यामुळे अनेकांचा ढिगा-याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू दुजसे प्रांतातील गोलकाया येथे होता. हे शहर इस्तंबूलपासून २०० किलोमीटर अंतरावर आहे. याच शहरात १९९९ मध्ये ७.२ रिश्टर स्केलचा सर्वात धोकादायक भूकंप झाला होता, ज्यामध्ये ८४५ लोकांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading