सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सरस्वती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
प्र -कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सहायक प्राध्यापक डॉ. राजेंद्र बगाटे यांच्यासह विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विविध संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
