Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

१७ व्या पुणे डिझाईन फेस्टीव्हल’ मध्ये कीर्ती त्रिवेदी, प्रदीप आणि माला सिन्हा यांचा विशेष सन्मान

पुणे  : असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय), पुणे चॅप्टर तर्फे डिझायनिंग समुपदेशक व उद्योजक प्रदीप सिन्हा, बोधी ब्रँड च्या संस्थापिका आणि टेक्स्टाइल डिझायनिंग क्षेत्रातील तज्ज्ञ माला सिन्हा व डिझायनिंग एज्युकेशन क्षेत्रातील तज्ज्ञ प्रा. कीर्ती त्रिवेदी यांचा एडीआय संस्थेचे मानद सदस्यत्व प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.

एडीआय, पुणे चॅप्टर तर्फे आयोजित १७ वी ‘पुणे डिझाईन फेस्ट २०२३’ ही डिझाईन विषयक राष्ट्रीय परिषद नगर रस्ता येथील हॉटेल हयात रिजेंसी येथे संपन्न होत आहे. ‘नेक्स्ट २५ ‘ अर्थात आगामी २५ वर्षे अशी संकल्पना असलेल्या या परिषदेत आज एडीआय’ चे अध्यक्ष ए बालासुब्रम्हण्यम यांच्या हस्ते त्रिवेदी आणि सिन्हा दांपत्य यांना मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले. यावेळी एडीआय, पुणे चॅप्टर’चे प्रमुख ऋग्वेद देशपांडे हे यावेळी उपस्थित होते.

कीर्ती त्रिवेदी यांना डिझायनिंग एज्युकेशन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानसाठी तसेच डिझायनिंग समुपदेशक प्रदीप सिन्हा यांना डिझाईन आंत्रप्रेन्युअरशिप’मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी तर त्यांच्या पत्नी माला सिन्हा यांना टेक्स्टाइल डिझायनिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात प्रदीप सिन्हा यांनी डिझाईन आंत्रप्रेन्युअरशिप’मधील त्यांच्या प्रवासाबाबत, तर माला सिन्हा यांनी टेक्स्टाइल डिझायनिंग क्षेत्रातील प्रवासाबाबत उपस्थितांशी संवाद साधला.

तर उज्जैन येथील अवंतिका युनिव्हर्सिटी मानद प्राध्यापक आणि भारतात उभारत असलेल्या पहिल्या स्कूल ऑफ डिजिटल आर्ट’चे मार्गदर्शक प्रा. कीर्ती त्रिवेदी यांनी डिझायनिंग क्षेत्रातील त्यांच्या एकूण कारकीर्द आणि अनुभवांचे कथन केले.

सुरेश वेंकट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading