कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असताना विरोधकांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. दारम्यान भाजपने दोन्ही जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली असून चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. आता महाविकास आघाडी चे उमेदवार कोण? असणार यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
