fbpx

पुणे शहरामध्ये देशाची ‘ डिझाईन कॅपिटल ‘ बनण्याची क्षमता

पुणे  : ” पुणे शहरामध्ये डिझायनिंग विषयाचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहे. या विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात काम करणारे अनेक नामांकित स्टुडिओदेखील पुण्यामध्ये आहे. त्यामुळेच पुणे शहरामध्ये देशाची ‘ डिझाईन कॅपिटल ‘ बनण्याची क्षमता आहे,” असे मत द हार्ड कॉपी मॅग्झीन’च्या संस्थापिका मीता मल्होत्रा यांनी व्यक्त केले.

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय), पुणे चॅप्टर या संघटनेतर्फे आयोजित १७ वी ‘पुणे डिझाईन फेस्ट २०२३’ ही डिझाईन विषयक राष्ट्रीय परिषद नगर रस्ता येथील हॉटेल हयात रिजेंसी येथे संपन्न होत आहे. ‘नेक्स्ट २५ ‘ अर्थात आगामी २५ वर्षे  अशी संकल्पना असलेल्या या परिषदेत मल्होत्रा यांनी ‘ पुणे – फॉर डिझाईन बाय डिझाईन’ या विषयावर संवाद साधला. यावेळी एडीआय, पुणे चॅप्टर’चे प्रमुख ऋग्वेद देशपांडे उपस्थित होते.
मल्होत्रा म्हणाल्या, ” पुणे शहरात डिझायनिंग क्षेत्राची वृध्दी होत आहे. ही एक चांगली बाब आहे. मात्र डिझाईन कॅपिटल बनण्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी या क्षेत्राने दोन गोष्टींवर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे अधिकाधिक रोजगारनिर्मिती आणि डिझाईन क्षेत्राबाहेरील भागीदारांसोबत योग्य आणि सातत्यपूर्ण संवाद. या दोन्ही गोष्टींच्या मदतीने पुण्यात डिझाईन क्षेत्र आणखी वृद्धिंगत होईल.”
यासंदर्भातील संवादासाठी पुणे डिझाईन फेस्टीव्हल’सारखे उपक्रम अतिशय उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये देखील संवादात्मक उपक्रम राबविण्यावर भर दिली पाहिजे, असेही मल्होत्रा यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वेंकट यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: