Thursday, September 24, 2026
BusinessLatest News

व्हॅलेंटाइन डेकरिता द बॉडी शॉपचे आकर्षक गिफ्टिंग कलेक्शन

पुणे : द बॉडी शॉप या ब्रिटन-स्थित आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने व्हॅलेंटाइन्स डे गिफ्टिंग श्रेणी सादर करण्यात आली आहे आणि ती पर्यावरणाप्रती योगदान देण्याचे प्रबळ आवाहन करण्यासोबत पर्सनल केअरला अधिक प्राधान्‍य देणाऱ्यांस निश्चितच आनंदित करेल. या कलेक्शनमध्ये स्वीटेस्ट स्ट्रॉबेरी हार्ट गिफ्ट बॉक्स, क्लीन अॅण्ड ग्लीम टी ट्री स्किनकेअर गिफ्ट सेट, स्मूथ अॅण्ड सूथ शेव्हिंग किट, रिफ्रेशिंग अॅण्ड अपलिफ्टिंग व्हाइट मस्क फ्लोरा ड्युओ आणि हायड्रेटिंग अॅण्ड प्रोटेक्टिंग हेम्प गिफ्ट सेट आदी उत्पादनांचा समावेश आहे.

स्वीटेस्ट स्ट्रॉबेरी हार्ट गिफ्ट बॉक्स स्ट्रॉबेरी लिप बटर, स्ट्रॉबेरी बॉडी बटर आणि स्ट्रॉबेरी हँड क्रीमसह येतो, जे तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत टीएलसी देण्याची हमी देते. पण पोषण देण्यासोबत गिफ्ट बॉक्स घानामधील स्थानिक समुदायांना, विशेषत: महिलांना मदत करते, कारण बॉडी बटर आणि हँड क्रीम आफ्रिकन राष्ट्राच्या कम्युनिटी फेअर ट्रेड शीया बटरने हस्तनिर्मित करण्यात आले आहेत. या गिफ्ट बॉक्सची किंमत १,३९५ रूपये आहे.

द बॉडी शॉपचा क्लीन अॅण्ड ग्लीम टी ट्री स्किनकेअर गिफ्ट सेट त्वचेवरील डाग दूर करेल, तुम्हाला स्वच्छ, तेजस्वी आणि शुद्ध त्वचा देईल. या गिफ्ट सेटमध्ये टी ट्री क्लीअरिंग मॅटिफाईंग टोनर, टी ट्री ऑईल आणि टी ट्री स्किन क्लीअरिंग फेस वॉश आहे. याची किंमत १,४९५ रुपये आहे.

द बॉडी शॉपच्या स्मूथ अॅण्ड सूथ शेव्हिंग किटमध्ये गुळगुळीत व स्वच्छ शेव्हसाठी माका रूट आणि अॅलो व्हेराच्या चांगल्या गुणांनी युक्त उत्पादने आहेत. तसेच, स्टबल-स्मूथिंग ट्रीट मेक्सिकोच्या कम्युनिटी फेअर ट्रेड ऑरगॅनिक कोरफडीच्या सहाय्याने बनवले जाते. या किटमध्ये माका रूट अॅण्ड अॅलो शेव्हिंग जेल, माका रूट अॅण्ड अॅलो पोस्ट शेव्‍ह जेल समाविष्ट आहेत आणि याची किंमत २८९५ रुपये आहे.

आनंददायी सुगंधांची आवड असलेल्यांसाठी व्हाइट मस्क फ्लोरा ड्युओ परिपूर्ण भेट आहे. तुम्हाला ताजे, सर्वोत्तम आणि ताजेतवाने सुगंध देऊन या ड्युओची उत्पादने तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत उत्साही ठेवतील. या गिफ्ट बॉक्समध्ये व्हाइट मस्क® फ्लोरा फ्रँग्रॅन्स मिस्ट, व्हाइट मस्क® फ्लोरा शॉवर जेल, कम्युनिटी फेअर ट्रेड कार्ड समाविष्ट आहेत आणि याची किंमत २,५३५ रुपये आहे.

द बॉडी शॉपचे हायड्रेटिंग अॅण्ड प्रोटेक्टिंग हेम्प गिफ्ट सेट परिपूर्ण भेट आहे, जे अधिक केअर व पोषण देईल. तसेच गिफ्ट बॅगमध्ये पुनर्वापर करता येण्यासाठी तागापासून डिझाइन केलेल्‍या हेम्प उत्पादनांचा समावेश आहे. या बॉक्समध्ये हेम्प बॉडी बटर, हेम्प हँड प्रोटेक्टर आणि हेम्प शॉवर ऑईल असून याची किंमत ४,९९५ रूपये आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading