Friday, September 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘तू चाल पुढं’ म्हणत अश्विनी वाघमारे ठरतेय अनेकांसाठी आदर्श….

आज टेलिव्हिजन मालिका प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा मनोरंजनाचा भाग बनल्या आहेत. प्रत्येक कुटुंबात किमान एकतरी व्यक्ती असेल ज्याला मालिका पाहायला आवडतात याच मुख्य कारण म्हणजे मालिकेत जीवनात घडणाऱ्या घटना दाखवण्यात येतात. याला काही लोक सहमत तर काही असहमत असतात. बर्‍याच मालिकांमध्ये बहुतेक कथा स्त्रीवर केंद्रित असतात. यातील एक महत्वाची मालिका म्हणजे झी मराठीवर सुरु असलेली ‘तू चल पुढे’. अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील अश्विनी इतकी लोकप्रिय झाली आहे की ती अनेकांसाठी आदर्श बनली आहे. मालिका पाहून एका गृहिणीने अश्विनीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आत्मविश्वासाने स्वतःचे पार्लर सुरू केले आहे, तिने त्या पार्लरचे नावही ‘अश्विनी ब्युटी पार्लर’ असे ठेवले आहे. तिचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. अश्याच प्रकारे अनेक सामान्य गृहिणी अश्विनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन पुढे जातील. अशी पोस्ट देखील तिने टाकली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading