fbpx
Tuesday, May 14, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भाजपचे तिकीट पाहिजे, ७६ हजार रुपये द्या; या इच्छुकाला आला कॉल

पुणे – ‘कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे तिकीट पाहिजे, तर ७६ हजार रुपये पाठवा’ असा फोन  भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले कुणाल टिळक यांना आला. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार आहे, ही बाब लक्षात आल्यानंतर कुणाल टिळक यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेसाठी भाजप, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या इच्छुकांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांच्यासह काही इच्छुकांची नावे केंद्रीय कार्यकारिणीकडे पाठविली आहेत.

दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने कुणाल यांना मोबाईलवर संपर्क साधला. ‘मी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयामधून बोलत आहे. तुमचे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट निश्चित झाले आहे. तुम्ही यूपीआयने ७६ हजार रुपये पाठवा’ असे सांगितले. परंतु आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे, असे कुणाल यांच्या लक्षात आले. त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे तक्रार केली.

कुणाल टिळक म्हणाले, मला चार-पाच दिवसांपूर्वी अशा प्रकारचा फोन आला होता. परंतु फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार दिली आहे. परंतु सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिलेली नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading