Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

कुस्ती फेडरेशन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह हटाव मागणीसाठी राज्यभर निदर्शने 

पुणे : देशाच्या महिला कुस्तीपटूंचे अपमान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका घेत संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात आणि पुणे येथे बी.एस.एन.एल.एम्प्लाईज युनियन आणि वर्कींग वूमन को-ऑर्डीनेशन कमिटी पुणे यांच्या वतीने ‘कुस्ती फेडरेशन अध्यक्ष हटाव’ ही मागणी करत निदर्शने केली.यावेळी ऑल इंडिया कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात केंद्र सरकारने ताबडतोब कारवाई करून त्यांची पदावरून हकालपट्टी करावी.आणि त्यांच्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

 यावेळी सर्व महिलांनी स्वतःला साखळदंड बांधून घेतले तर काही महिलांनी स्वतःला दोरीने बांधून घेऊन या आंदोलनात सहभाग घेतला. सरकार घोषणा करत आहे बेटी बचाव,बेटी पढाव सरकारने बेटीला सन्मान सुध्दा दिला पाहिजे अशी मागणी आंदोलनास उपस्थित महिलांनी केली. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.पुण्याचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड युसुफ जकाती यांनी सभेला मार्गदर्शन केले.जिल्हा सचिव विकास कदम, गणेश भोज,खालीद सय्यद, नितीन कदम, विजय झगडे,मंजुषा लचके,शामा गांधी, संगिता नागपुरे,मनिषा कानिम, सुजाता धामणे, गौरी वैद्य, बेबीताई जगताप,विमल माने, विजया सांगळे,आदी अनेक महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading