आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत .त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत – सुप्रिया सुळे
पुणे:अब्दुल सत्तार आज बारामती दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बारामती मध्ये येत आहेत.कोणी बारामतीमध्ये येतात त्यांचे स्वागत आहे. कारण आमच्यावर अतिथी देवो .भव असे संस्कार झाले आहेत .त्यामुळे जे येतील .त्यांचे स्वागत असल्याचे खासदार सूप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सूळे यांनी.राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, राज्यातील एकनाथ आणि देवेंद्र म्हणजे ED सरकार आहे. या सरकारमध्ये केवळ सामान्या व्यक्ती भरडला जातोय. असे सू प्रिया सुळे म्हणाल्या.
स्थानिक निवडणुकीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘सुनावणी पुढे गेली यात आश्चर्य वाटत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ईडी सरकारला यश मिळणार नाही, हे मी सातत्याने सांगते आहे. सर्वसामान्य लोकांची अडचण होते, त्यांनी जायचे कुणाकडे? कुठलं ना कुठलं कारण सांगून हे सरकार निवडणूक पुढे ढकलत आहे. यात नुकसान जनतेचे होत आहे.
नवाब मलिक यांच्यावरील कारवाईसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्यावर सारख्याच तक्रारी होतात. त्याच्यात मला काही आश्चर्य वाटत नाही. हे सुडाचे राजकारण राज्यात थांबत नाहीये. असे आरोप हे विरोधी पक्षावर झाले आहेत. ‘
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ग्राम पंचायत असो किंवा संसद निवडणूक मोदीजींना सर्वत्र ठिकाणी पळायला लागतं, त्यांची ही धावपळ पाहून मला त्यांची काळजी वाटते असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. सध्या भाजपजवळ नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती आता ती दिसत नसल्याचेही त्या म्हणाल्या.
