Tuesday, October 27, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंतला अटक

मुंबई : टेलिव्हिजनची ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंतला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून राखीला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, नुकतीच राखी बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये दिसली होती. तसेच काही दिवसांपासून राखी तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी राखीला अटक केली आहे. काल राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, असं ट्विट शर्लिनने केलं आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading