fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsPUNE

पतित पावन संघटनेच्या पुणे शहराध्यक्षपदी स्वप्नील नाईक 

पुणे : पतित पावन संघटनेच्या पुणे शहराध्यक्षपदी स्वप्नील नाईक यांची नुकतीच निवड झाली. संघटनेचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष सोपान देशमुख यांनी ही नियुक्ती केली असून पुणे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. पुणे शहराच्या उपाध्यक्षपदी संतोश शेंडगे व निलेश जोशी, सरचिटणीसपदी ललित खंडाळे व मनोज पवार, कार्याध्यक्ष धनंजय क्षीरसागर, पुणे शहर संपर्कप्रमुखपदी गुरु कोळी आणि संघटकपदी विक्रम मराठे यांची नियुक्ती झाली आहे.

याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, संघटक सीताराम खाडे, प्रांत संपर्कप्रमुख राजेश मोटे, पुणे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, कार्याध्यक्ष विश्वास मणेर, उपाध्यक्ष प्रवीण झंवर आदी उपस्थित होते. ही कार्यकारिणी पुढील दोन वर्षांसाठी असणार आहे. संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील नाईक हे अनेक वर्षे पतित पावन संघटनेत कार्यरत असून विविध सामाजिक संघटनांशी संलग्न आहेत. आंदोलन, जनजागृतीपर कार्यक्रमांमधून पुणेकरांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी यापूर्वी देखील केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading