Friday, August 28, 2026
Latest NewsMAHARASHTRA

महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्या पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमेला तात्काळ बडतर्फ करा – डॉ. नीलम गोर्‍हे यांची मागणी

पुणे, : महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असतानाच सहायक आयुक्त दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच रविवार, दिनांक १४ जानेवारी, २०२३ रोजी महिलांशी अश्लील प्रकार केल्याचे संभाजीनगरमध्ये उघडकीस आले आहे.

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांनी गाडीत एका ओळखीच्या महिलेशी अश्लील चाळे, घरात घुसून पीडित महिलेच्या पती, सासूला शिवीगाळ केली आहे. यासंदर्भात सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढुमे यांचा हा पहिला प्रकार नसून अहमदनगर येथे देखील त्यांनी असेच प्रकार यापूर्वीदेखील केले आहेत. यासंदर्भात नगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कार्यालयीन चौकशी देखील लावली होती. याचदरम्यान ढुमे यांची बदली संभाजीनगर येथे झाली. अशा महिलांशी अश्लील, असभ्यवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. यास्तव ढुमे यांना नुसते निलंबन करून उपयोग नाही तर तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पत्राच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलवर देखील कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत. ज्या परिसरात उशिरापर्यंत हॉटेल सुरू असताना सुद्धा त्यावर कारवाई केली जात नाही. अशा संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस व कामगार विभाग तसेच अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यावर कारवाई देखील करण्याची सूचना सदरील पत्राच्या माध्यमातून डॉ. गोर्‍हे यांनी केली आहे.

सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या विशाल ढुमे यांनी इतका धक्कादायक प्रकार करूनही महाराष्ट्रातील व संभाजीनगर परिसरातील महिलाच्या प्रश्नावर अनेक ईतर विषयात क्रियाशील व प्रसिद्ध राजकीय महिला कार्यकर्ते यांनी यासंबंधी कारवाईसाठी प्रयत्न केला नाही या बद्दल डॉ. गोर्‍हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading