महालक्ष्मी पवार यांचा राष्ट्रीय युवा कलारत्न पुरस्काराने सन्मान
पुणे : राजस्थानमधील टोंक येथे १६ वे राष्ट्रीय कलापर्व पार पडले. यामध्ये पुण्यातील चित्रकार महालक्ष्मी पवार यांना ‘राष्ट्रीय युवा कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच दिल्ली आर्टच्या वतीने चित्रकला क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल ‘ग्रेट पर्सनॅलिटी ग्लोबल इंटरनॅशनल अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी अनेक देश-विदेशातील राज्यातील ४०० पेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग होता. महालक्ष्मी पवारांना विविध, राज्यातून देशातून त्यांच्या कलेसाठी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. हनुमान सिंह खरेडा हे कलापर्वाचे आयोजक होते. माजी आमदार अजीतसिंह मेहेता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महालक्ष्मी पवार या पुण्यातील आर्ट मॅजिक या ड्रॉईंग क्लासच्या संस्थापिका आहेत. संस्थेला आणि त्यांना त्यांच्या चित्रकलेतील योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना यापूर्वी इमिनिंट आर्टिस्ट, कलाद्रोणा भारत सरकार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
