Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

नांदेडच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही ‘वॉक ऑन राईट’ चळवळ उभारण्याची गरज

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचे आवाहन

पिंपरी : पादचाऱ्यांचे वार होणारे अपघात टाळण्यासाठी पादचार्‍यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने जावे. समोरून येणारे वाहन दिसून स्वतःचा बचाव करणे सोपे जाते. त्यामुळे उजव्या बाजूने चालण्याबाबत विविध समाज माध्यमातून चळवळ उभारण्याची गरज आहे. नांदेड शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातही पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, परिवहन अधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘वॉक ऑन राईट’बाबत नागरिकांना परावृत्त करावे. जेणेकरून अपघात टाळणे शक्य होईल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, की रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत पोलीस प्रशासन, आरटीओच्या वतीने रस्ते अपघाताविषयी विविध माध्यमातून जनजागृती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात ‘वॉक ऑन राईट’ (उजव्या बाजूने चाला) मोहीम सुरू केलेली आहे. याचा फायदा मॅार्निंग वॅाक करणार्‍यांना जास्त होत आहे. रस्त्याच्या कडेला चालताना खबरदारी घेणे अत्यावश्यक बनले आहे.

समोरून येणारे वाहन पादचाऱ्याला दिसले पाहिजे. एखादे वाहन वेगात येत असल्यास किंवा त्यामुळे अपघात होत असल्यास बचाव करणे सोपे होईल. यामुळे अपघात टाळता येणे शक्य आहे. तसेच सोनसाखळी चोरांपासून महिलांना अटकाव करता येईल. भारतामध्ये रस्‍त्याने चालताना सहसा पादचारी डाव्या बाजूने चालतात. त्यामुळे पाठीमागून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक वेळा अपघात होऊन मृत्यू ओढवतो. रस्त्यांच्या उजव्या बाजूने चालल्यास समोरून येणार्‍या वाहनाचा निश्‍चित अंदाज बांधून सुरक्षितता घेता येऊ शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रशासकीय यंत्रांबरोबरच स्वयंसेवी संस्था, संघटना, शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वॉक ऑन राईट’ मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे, असेही राजेंद्र जगताप म्हणाले.

‘वॉक ऑन राईट’चे नागरिकांना आवाहन

रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसते. विशेषतः मॉर्निंग वॉकसाठी जाताना हा नियम महत्त्वाचा आहे. नांदेड शहरात ‘वॉक ऑन राईट’ (उजव्या बाजूने चाला) मोहीम सुरू केलेली आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, परिवहन अधिकारी यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या मोहिमेअंतर्गत नागरिकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचे आवाहन केले आहे. अगदी याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातही पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘वॉक ऑन राईट’चे नागरिकांना आवाहन करावे. जेणेकरून अपघात टाळणे शक्य होईल.

-राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading