fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धावत्या एसटीचे स्टेअरिंग तुटले; 35 प्रवासी जखमी

लातूर : लातूरहून पुणेच्या दिशेने निघालेली एस. टी. बस लातूर तालुक्यातील बोरगाव काळे गावाजवळील पुलावर पोहोचताच बसचा स्टेअरिंग रॉड तुटला आणि बस पुलावरुन खाली घसली. या अपघातात बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले. बस चालकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली.

मंगळवारी सकाळी लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून एमएच २० बीएल २३७२ या क्रमांकाची बस पुणे वल्लभनगरला निघाली. ही बस बोरगाव काळे गावाजवळील पुलाजवळ सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचली. बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला आणि बस पुलावरुन रस्त्याच्याखाली घसरली. बसचा पुढील भाग पुलाखालील मातीच्या ढिगा-यावर धडकला आणि बस थांबली. या अपघातात बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले. बस चालकाच्या डोक्याला जबर मार लागला. प्रत्यक्षदर्शनीने तात्काळ १०८ रुग्णवाहिलेला कळवले.

रुग्णवाहिला घटनास्थळी आली आणि जखमी प्रवाशांना मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी ३५ प्रवाशांपैकी १६ जणांवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचरासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पाठविण्यात आले आहे. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या अपघातामुळे लातूर-बार्शी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. लातूरचे वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading