Thursday, August 27, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

उर्फी जावेदला पोलिस संरक्षण

मुंबई : मॉडेल उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद आता महिला आयोगाच्या समोर गेला आहे. महिला आयोगाकडे दोघींनीही तक्रार केली आहे. उर्फी जावेद प्रकरणावरुन मुंबई पोलिस आयुक्तांना आयोगाकडून पत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करते, माझे राहणीमान आणि दिसणे व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे असे उर्फीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रार अर्जामध्ये उर्फी पुढे म्हणते असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वत:च्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत.

सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही. त्यामुळे मला पोलिस संरक्षण देण्यात यावे. तर मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करा असे आदेश महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading