साउथ इंडियन बँकेचा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) सोबत सामंजस्य करार
साउथ इंडियन बँक आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी देशभरातील सेलच्या वितरकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. साउथ इंडियन बँकेचे प्रवीण जॉय (प्रमुख – बँकिंग व्यवहार गट) आणि सेलचे सुरेंद्र कुमार शर्मा ( मुख्य महाव्यवस्थापक – वित्त आणि लेखा) यांच्यात ११ जानेवारी २०२३ रोजी सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली. श्री जिलजिथ जे ( सहाय्यक महाव्यवस्थापक आणि विभागीय प्रमुख कलकत्ता, साउथ इंडियन बँक) आणि चैताली देब (महाव्यवस्थापक– वित्त आणि लेखा ,सेल ) याप्रसंगी उपस्थित होते.
या सामंजस्य करारावर भाष्य करताना, साउथ इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुरली रामकृष्ण म्हणाले,”या सहकार्य करारामुळे आम्हाला सेलच्या वितरकांना खेळते भांडवल, विशेषत: स्टील खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे शक्य होईल. आमच्या ९२८ शाखांच्या जाळ्यासह, आम्ही वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात असलेल्या एमएसएमई आणि सेलच्या कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देऊ शकू.आम्हाला खात्री आहे की या सहकार्याचा वितरकांना त्यांच्या खरेदीचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिक आर्थिक संधी देऊन त्यांचा फायदा होऊ शकेल. उद्योगासाठी स्टील हा एक महत्त्वाचा घटक असल्याने सेलला आणि केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या देशातील पोलाद उत्पादनाला बळकटी मिळेल“.
सेलचे सुरेंद्र कुमार शर्मा(मुख्य महाव्यवस्थापक– वित्त आणि सीएमओ) अधिक माहिती देताना म्हणाले की, ”पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठी पोलाद हा एक आवश्यक घटक आहे. सेलकडे वितरकांचे विस्तीर्ण जाळे आहे जे देशातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये दर्जेदार स्टीलची उपलब्धता सुनिश्चित करतात. साउथ इंडियन बँकेसह आमची संस्था त्यांना स्पर्धात्मक किमतींवर पर्यायी वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध करून देईल. यामुळे पुरवठा साखळीतून पोलादाचा अखंड आणि सुरळीत प्रवाह याची खात्री मिळेल. यामुळे उद्योगाचे चक्र सुरळीत सुरू राहण्याची खात्री मिळेल.”
