Monday, October 26, 2026
Latest NewsPUNE

स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे पर्वतीकरा करिता बेमुदत उपोषण

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे आज विधान सभा अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या नेतृत्वाखाली योगेश पवार सुशांत ढमढरे, गणेश दामोदरे, गौरव घुले, आदीसह बेमुदत आमरण उपोषण आज सुरू करण्यात आले.

वारंवार पर्वती जलकेंद्रातून पाणी मुबलक मिळत नसल्यामुळे, पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची उंची भरत नसल्यामुळे, वीज विद्युत वितरण कडून खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे, मुख्य पाईपलाईनचे गेट पडल्यामुळे, तसेच पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याच्या विविध कारणे रोज अधिकारी देत असल्यामुळे त्याला वैतागून स्थानिक नागरिक, महिला, यांच्यासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह उपोषणास सुरुवात झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून पर्वती मतदार संघातील बिबेवाडी या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्वच भागाला पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे विशेष करून प्रभाग क्रमांक जुना 28, 36, 35, 37, 39 या प्रभागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे तर काही ठिकाणी पाणी येत नाही त्याच्या मुळे नागरिक त्रस्त झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या संदर्भामध्ये 9 मे 2022 रोजी देखील दोन दिवसांचे उपोषण केलं होतं काही दिवस समस्या सुटल्या परंतु त्या पुन्हा उदभवू लागल्या आहेत. त्याकरिता हे उपोषण सुरु करण्यात आले.

आंदोलनाला दुपारी मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पुणे शहर अनिरुद्ध पावसकर व त्यांचे खात्याचे संबंधित अधिकारी यांनी आंदोलन स्थळला भेट दिली. तसेच यावेळी नागरिकांनी महिलांनी तसेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात होणाऱ्या अडचणीचा पाढा त्यांच्यासमोर मांडला व त्यांनी देखील पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या, त्रुटी येत्या येत्या शनिवार पर्यंत सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसे लेखी पत्र उप अभियंता अजित नाईकनवरे व अंजुषा रेड्डी यांनी दिले.

आपण जर दिलेल्या मुदतीत समस्या सोडविल्या नाहीतर अत्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विधासभा अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिला.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रविंन्द्र माळवदकर , महेश शिंदे, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, विपुल म्हैसूरकर, बाळासाहेब अटल, दिलीप अरुंदेकर, समीर पवार, संजय दामोदरे, विजय बगाडे, राहुल गुंड, सतीश धर्मावत, विनय पाटील, विद्या ताकवले, रुपाली बिबवे, राणी दामोदरे, अमोल ननावरे, लखन वाघमारे, तुषार शेषनाईक, राजेंद्र चोरघे, शंकर सहाणे,प्रतिक कोंडे,अमोल शिंदे, कृणाल गायकवाड, सौरभ माने, संतोष पोले, अविनाश शिखापुरे , अमोल परदेशी, संदेश नाक्ते आदी पदाधिकारी व महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading