Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

धायरीकरांच्या आपुलकीने हिंद केसरी अभिजित कटके भारावले

पुणे : धायरीकरांच्या आपुलकीने हिंद केसरी अभिजित कटके भारावून गेले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस
श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चव्हाण पाटील परिवाराच्या वतीने पैलवान कटके यांना आर्थिक मदत तसेच सन्मान चिन्ह देऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सन्मान सोहळ्यात धायरी, सिंहगड परिसरातील कुस्तीगीर,वस्ताद तसेच विविध क्षेत्रातील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी,आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, उद्योजक कैलासराव चव्हाण पाटील, पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे ,प्रा.राजु मते आदी उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, शिवकाळा पासून महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा आहे. छत्रपती शिवरायांनी कुस्ती , युद्धकलेला राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. राष्ट्राच्या रक्षणासाठी मावळ्यांना सज्ज केले. गरजु, गुणवान खेळाडू कुस्तीगीरांना मदत देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading