Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

मकर संक्रांती सणा निमीत्त नटू दादा सोशल फाउंडेशन चॅरिटेबल सेवा ट्रस्ट मार्फत फळ व तिळगुळ वाटप

पुणे: स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या व सदैव त्यासाठी प्रयत्नशील व अग्रेसर असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत तीळ गूळ व फळ वाटपाचा कार्यक्रम झाला. निमित्त होते नटू दादा सोशल फाउंडेशन चॅरिटेबल सेवा ट्रस्टने घेतलेला सामाजिक कामाचा एक उपक्रम. मकरसंक्राती सणाच औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृहातील मुलींना राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते तिळगुळ व फळ वाटप झाले.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष जितेश वालेकर म्हणाले की खारीचा वाटा का होईना समाजातील प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जपत समाजा प्रती आपल देणं असल पाहिजे मग ते कुठल्याही माध्यमातन उदा. पैसा, कपडे, शिक्षणासाठी सहाय्य. हाच विचार घेऊन नटू दादा सोशल फाउंडेशन चॅरिटेबल सेवा ट्रस्ट सामाजिक उपक्रम राबवत असते. बेघर असो की गरजू अशा सर्वांना फाउंडेशन आपल्या परीने मदत करत राहते. मुलींनी प्रार्थनाने कार्यक्रमांची सुरवात केली. कार्यक्रमाची आयोजन करण्यात वैशाली कुलकर्णी यांचा पुढाकार होता. यावेळी उपाध्यक्ष उमाकांत गिरमे, सचिव परेश सोलंकी, कार्यकर्ते विशाल बागुलही उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading