Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

श्रीरंग चव्हाण पाटील यांचे कार्य निस्वार्थी व समाजहिताचे – उल्हास पवार

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण यांचा वाढदिवस धायरी येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व कष्टकरी महिला मजुरांनी गर्दी केली होती
ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले चव्हाण पाटील हे राजकारणात अनेक वर्षापासून सक्रिय आहेत असे असले तरी त्यांनी सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात आपल्या निस्वार्थी कार्याचा ठसा उमटवला आहे
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध पक्षाचे नेत्यांनी फोन द्वारे व प्रत्यक्ष भेटून चव्हाण पाटील यांना शुभेच्छा दिल्या
ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, आमदार भीमराव तापकीर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड शिवाजीराव जांभुळकर, सरचिटणीस सोपानराव म्हस्के , जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा किरणताई काळभोर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे हवेली तालुका अध्यक्ष शिवदास काळभोर, आळंदी काँग्रेसचे संदीप नाईकरे आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी तसेच खडकवासला मतदार संघातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या
धायरी येथील शिवकालीन श्री काळभैरव मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या दोन दिवशीय कीर्तन महोत्सव ची सुरुवात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ह भ प नरेंद्र महाराज गुरव यांचे कीर्तनाने झाली,

यावेळी महा,प्र, कॉंग्रेस कमिटी सदस्य श्रीकृष्ण बराटे, किसान सेल काँग्रेसचे जिल्हाऊपाध्यक्ष शंकरराव दांगट विजयराव लगड रघुनाथ यादव धनंजय पाटील सुरेश मते पै राजू मते कॉसमॉस बँकेचे संचालक मिलिंद पोकळे सातबारा पोकळे गुलाबराव पोकळे साहेबराव मते विलास मते डॉक्टर गायकवाड चेतन जाधव हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते
सर्व कार्यक्रमाचे नियोजन धायरी ग्रामस्थ आणि खडकवासला काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांनी केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading