Nepal : येति एअरलाइन्सचे विमान कोसळले; 32 प्रवाशांचा जागीच मृत्यू
नवी दिल्लीः नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे येति एअरलाइन्स(Yeti Airlines)चे विमान कोसळले. या विमानात 68 प्रवासी होते. त्यातील 32 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे येति एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची माहिती नेपाळी माध्यमांकडून मिळाली आहे. विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते.
काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारे येति एअरलाइन्सचे एटीआर 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळले. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. येति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी मीडियाला सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या छायाचित्रे आणि व्हिडीओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. या विमान अपघाताबाबत अजून माहिती मिळालेली नाही. अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
