इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स क्रिकेट कंडक 2023 स्पर्धेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट संघाला विजेतेपद
पुणे : इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स यांच्या वतीने व अल्ट्रा टेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स क्रिकेट कंडक 2023 स्पर्धेत अंतिम फेरीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस(आयआयए) पुणे संघाने क्रेडाई संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले
व्हिजन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत निखिल जैनच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस पुणे संघाने क्रेडाई संघाचा 13 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना सोनिक भंडारेच्या नाबाद 19 व निखिल जैनच्या नाबाद 11 धावांसह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस पुणे संघाने 8 षटकात 5 बाद 63 धावा केल्या. 63 धावांच्या अव्हानाचा पाठलाग करताना निखिल जैन, विनय काटे, जयंत सावंत व सुनिल जाधव यांच्या अचूक गोलंदाजीने क्रेडाई पुणे संघाचा डाव 8 षटकात सर्वबाद 50 धावांत रोखत विजय संपादन केला. नाबाद 11 धावा व 6 धावात 3 गडी बाद करणारा निखिल जैन सामनावीर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आरकिटेक्टस् पुणे व उपविजेत्या क्रेडाई पुणे संघाला करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अल्ट्राटेक सिमेंटचे सेल्स हेड संजय देशमुख आणि योगेश शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स पुणे सेंटरचे चेअरमन शिवदत्त पाटणे, केदार फडणीस, किशोर जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम फेरी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आरकिटेक्टस्पु(आयआयए)पुणे- 8 षटकात 5 बाद 63 धावा(सोनिक भंडारे नाबाद 19(12, 2×4), निखिल जैन नाबाद 11, हिमांशू अग्रवाल 2-11, हिरेन परमाल 1-12) वि.वि क्रेडाई पुणे- 8 षटकात सर्वबाद 50 धावा(करण अस्वानी 11(7, 1×6), रोनक पंजाबी 10, निखिल जैन 3-6, विनय काटे 2-13, जयंत सावंत 1-6, सुनिल जाधव 1-15) सामनावीर- निखिल जैन
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आरकिटेक्टस् पुणे संघाने 13 धावांनी सामना जिंकला.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज- करण आस्वानी(क्रेडाई)(67 धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- निखिल जैन(इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आरकिटेक्टस्)(4 गडी बाद)
मालिकावीर- गणेश तिकोणे(इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आरकिटेक्टस्)(71 धावा, 3 गडी बाद, 4 झेल)
