Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

चक्रीभजनाद्वारे श्री विठ्ठल भक्तीच्या दिव्य आध्यात्मिक आनंदाची प्रचिती

पुणे : टाळमृदुंगदिमडीचिपळ्यांंचा निनाद आणि एका विशिष्ट चालीमध्ये सूरताल लयीसह केलेल्या विठ्ठल नामाच्या जयघोषातून श्रोत्यांना दिव्य आध्यात्मिक आनंदाची प्रचिती आली.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआरआणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे शुक्रवारी (दि. 6) विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात चक्रीभजनाचे आयोजन करण्यात आले होतेगुरुबाबा महाराज औसेकर आणि त्यांच्या शिष्यांनी चक्रीभजन सादर केलेचक्रीभजनाचा हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी तसेच भक्तीरसाची अनुभूती घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होतीमूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉगोबंदेगलूकर यांची प्रमुख उपस्थिती होतीभारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या सल्लागार समितीचे सदस्य ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास आणि मुकुंद तापकीर तसेच आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला उपस्थित होत्या.

चक्रीभजनाच्या परंपरेविषयी माहिती देऊन देगलूरकर म्हणालेऔसेकर घराण्याने चक्रीभजनाची परंपरा नुसती जपली नाही तर वृद्धींगतही केली आणि अनेकांना विष्णुभक्तीचे वेड लावलेचक्री हे विष्णूचे विशेषण आहे आणि ते विठोबापर्यंत येऊन पोहोचतेअभंगाद्वारे विठोबाची भक्ती करणेत्याचे स्तवन करणे ते आपल्यासमोर मांडता येते.

पंडित सुहास व्यास म्हणालेआम्ही गायनाच्या क्षेत्रात असलो तरी आमच्या घराण्यात संत परंपरा आहेसंगीताच्या क्षेत्रातही भक्ती असतेच.

उल्हास पवार म्हणालेभारतीय उपखंडामध्ये आध्यात्मिक संस्कृती नांदते आहेही आध्यात्मिक संस्कृती जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य आयोजक संस्थांच्या माध्यमातून होत आहेही गौरवाची गोष्ट आहे.

पांढराशुभ्र सदराधोतरगळ्यात नारदीय वीणाहातात चिपळ्याडोक्यावर कृपाप्रासादिक हिरवा फेटापायात चाळकमरेला हिरवी शालगळ्यात तुळशीहारमुंडासेपाठीवर फुलांचा शेलाडोक्यावर फुलांचा नागफणारूपी मुकुट असा पेहराव करून गुरुबाबा महाराज औसेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विठ्ठल चरणी आपली चक्रीभजनाची सेवा समर्पित केली.

गुरुपरंपरेचे ध्यान करून चक्रीभजनाला सुरुवात करण्यात आलीमध्यभागी गुरुबाबा महाराज औसेकर आणि त्यांच्या भोवती गोलाकार रचनेतील त्यांच्या शिष्यांनी वैविध्यपूर्ण पद्धतीने पाऊले खेळतविठ्ठलाचा जयजयकार करतनृत्यगायनासह 14 अभंगभजने सादर केलीयात मालोपंतश्री तुकाराम महाराजश्री नामदेव महाराजश्री गुरुगुंडा महाराजश्री वीरनाथ महाराजश्री रामकृष्ण महाराज यांच्या अभंगांचा समावेश होता. ‘हेची मागतो तुजलाकृपादान गा विठ्ठलानाम तुझे असो वदनीनको विसरो दिन रजनी‘ या वीरनाथ महाराज रचित अभंगाने चक्रीभजानाची सांगता झाली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading