Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पतित पावन संघटनेच्या वतीने चार्ली हेब्दो कार्यालयावरील हल्ल्याचे स्मरण आणि मृतांना श्रद्धांजली

 
चार्ली हेब्दो कार्यालयावरील हल्लेच्या घटनेला  ७ वर्षे पूर्ण
पुणे : पतित पावन संघटना पुणे शहराच्या वतीने फ्रान्समधील व्यंगचित्र साप्ताहिक चार्ली हेब्दो च्या पॅरिस येथील कार्यालयावरील हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर ७ जानेवारी २०१५ रोजी  दहशतवाद्यांनी चार्ली हेब्दो च्या  कार्यालयावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या गोळीबारामध्ये १२ जण ठार झाले होते. त्यांना पतित पावन तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. धार्मिक कट्टरतेतून असे हल्ले घडू नयेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी पतित पावन संघटना पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल नाईक, शिवाजीराव चव्हाण, राजेश मोटे, वक्ते भारत आमदापुरे, सिताराम खाडे, दिनेश भिलारे, विश्वास मनेरे, प्रविण झंवर, मनोज पवार,  संतोष शेंडगे, निलेश जोशी, धनंजय क्षिरसागर, सौरभ पवार, विजय क्षिरसागर, पियुष वाईकर अक्षय जांभुरे, योगेश वाडेकर, शशी तोडकर, अक्षय राऊत, सुरज पोटे, अमर काकडे, राहुल शिंदे  यावेळी उपस्थित होते.
भारत आमदापुरे म्हणाले, धर्मातील चुकीच्या गोष्टींवर भाष्य करण्यासाठी चार्ली हेब्दो हे मासिक प्रसिद्ध आहे. या मासिकावर जो हल्ला झाला, त्या मागची विचारसरणी आपण लक्षात घेतली पाहिजे. २१ व्या शतकात प्रत्येक व्यक्तीला विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करण्यात आले आहे. विचारांची कट्टरता, धार्मिक कट्टरता आजही अनेक घटक उराशी बाळगून आहेत. अशा घटकांवर चार्ली हेब्दोने टिका केली आहे. या हल्ल्यात इस्लामिक धर्मांधतेने १२  जणांचा बळी गेला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
स्वप्निल नाईक म्हणाले, चार्ली हेब्दो या साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्याला ७ वर्षे पूर्ण झाली.  धर्मांध लोकांचा निषेध करण्यासाठी आणि हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading