Thursday, August 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो – चित्रा वाघ

पुणे: राज्याच्या राजकारणात उर्फी जावेद हे प्रकरण सध्या तापू लागलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली.चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली. दरम्यान, एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो, असं म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत . म्हणाल्या , एका मुलीचा मुंबईच्या रस्त्यांवरती आणि सार्वजनिक ठिकाणी ज्यापद्धतीने नंगानाच सुरू आहे. तो बंद व्हावा, यासाठी आम्ही आवाज उठवला. त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांकडेही गेलो. आमची भूमिका आम्ही त्यावेळी वेळोवेळी मांडली. काल बरेच प्रश्न आमच्या भूमिकेवर उपस्थित करण्यात आले.असं चित्रा वाघ म्हणाल्या.
आयोग म्हणजे अध्यक्षासह सदस्य असतात. महाराष्ट्राचे डीजी आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. एकटी मी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढा. मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली का?, मुंबई पोलीस आयुक्तांनी दखल घेतली नाही, हे कशाच्या आधारावर सांगता. एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतर अशी विधानं शोभत नाहीत.असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading