Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पॅन कार्ड मेळाव्याचे आयोजन.

पुणे: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकर नगर या भागामध्ये पॅन कार्ड व सुकन्या योजनेला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास नागरिकांचा जोरदार प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटक सचिव संजय दामोदर यांनी केले होते. ल कार्यक्रमाला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांची उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले या थोर समाज सुधारक होत्या त्यांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. अशिक्षित समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले अशा थोर शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले जयंतीच्या अनुषंगाने वस्तीपातळीवर या कार्यक्रमा दरम्यान असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. असे संघटक सचिव संजय दामोदर यांनी सांगितले. यावेळी दीपक फाउंडेशन सामाजिक संस्थेचे समाज कार्यकर्ते आरती पाटील, विशाल सातपुते, विलासीनी जाधव, शीतल राठोड, जागृती सरकाळे, मयूर पवार, मोहन परिहार, अदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading