fbpx

ट्रूकने बीटीजी एक्स१ गेमिंग इअरबड्स लॉन्च केले

मुंबई : ट्रूक या भारतातील प्रीमियम-क्वॉलिटी ऑडिओ वेअर निर्माण करण्यामधील अग्रगण्य ऑडिओ ब्रॅण्डने ९९९ रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीमध्ये अत्याधुनिक वायरलेस बीटीजी एक्स१ लाँच केला. बीटीजी (बॉर्न टू गेम) इअरबड्स अॅमेझॉन व फ्लिपकार्ट, क्रोमा इत्यादींसारख्या विविध बाजारस्थळांवर १४९९ रूपये किंमतीत उपलब्ध असेल.

बीटीजी एक्स१ ट्रू गेमिंग मोडच्या माध्यमातून अल्टिमेट गेमिंग अनुभव देतो. हा मोड जवळपास ४० एमएसपर्यंत दर्जात्मक अल्ट्रा लो लेटण्सी देतो. ऑडिओफाइल्स व संगीतप्रेमी बीटीजी एक्स१ च्या १२ मिमी टायटॅनियम स्पीकर ड्रायव्हर्सच्या माध्यमातून सिनेमॅटिक म्युझिक अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत गेमिंग व संगीत ऐकण्याचा आनंद घेण्यासाठी बीटीजी एक्स१ जवळपास ४८ तासांच्या एकूण प्लेआइमसह एकाच चार्जमध्ये १० तासांचा प्लेटाइम देतो. ट्रू वायरलेस हाफ-इन-इअर इअरबड्समध्ये क्वॉड-माइक एन्व्हारोन्मेंटल नॉईज कॅन्सलेशन (ईएनसी) आहे आणि २० आरजीबी गेमिंग कॅरेक्टराइज्ड केस डिझाइनसह येतात.

ट्रूक इंडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज उपाध्याय म्‍हणाले, ‘‘ट्रूक बीटीजी एक्स१ किफायतशीर दरामध्ये ग्राहकांच्या गेमिंग व संगीत ऐकण्याच्या अनुभवामध्ये परिवर्तन घडवून आणेल. गेमिंग इअरफोन्स बाजारपेठेत आमच्या कौशल्याप्रती वाढत्या मागणीमुळे नवीन उत्पादन लाँच करण्यात आले आहे. महामारीदरम्यान भारतभरात गेमिंग विभागामध्ये मोठी वाढ दिसण्यात आली, जेथे देशामध्ये जवळपास ५०७ दशलक्ष गेमर्स होते. भारतातील ऑनलाइन गेमिंगने २०२१ मध्ये १.३ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा टप्पा गाठला, ज्यामध्ये २०१९ मधील ९०६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत २८ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली.’’

‘‘यामधून आम्हाला आमच्या क्षमता वाढवण्यास संधी मिळाली आणि ट्रूक बीटीजी एक्स१ सह आम्‍ही ग्राहकांना गेमिंगशी समर्पित अत्याधुनिक, उच्च कार्यक्षम इअरबड्स देण्यास स्थित आहोत. तसेच निम्म्या दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री झालेले बीटीजी१, बीटीजी२, बीटीजी अल्फा आणि बीटीजी३ यांसारख्या आमच्या इतर उत्पादनांच्या यशामधून बीटीजी एक्स१ साठी उत्तम पाया दिसून येतो. आम्ही आमच्या सर्व निष्ठावान ग्राहकांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानतो आणि नवीन उत्पादनासह त्यांचा गेमिंग व संगीत ऐकण्याचा अनुभव अधिक वाढवण्याचे वचन देतो.’’

या उत्पादनाचे लाँच सर्वोत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्षमता, कार्यक्षमता, ग्राहक अनुभव व किफायतशीरपणाचे संयोजन असलेल्या दर्जात्मक उत्पादन ऑफरिंग्जसह साऊंडवेअर व सोनिक अॅक्सेसरीज क्षेत्रातील पसंतीचा ब्रॅण्ड बनण्याच्या ट्रूकच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: