Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

विभागीय आयुक्त कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे – विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेज (AFMC) साठी विभागीय आयुक्त कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः रक्तदान केले.

हे लष्करातील जवान आणि मिलिटरी हॉस्पिटलच्या सहकार्यासाठी आयोजित करण्यात आले होते. उपआयुक्त वर्षा लड्डा यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने शिबीर आयोजनात सहकार्य केले. एकूण १०१ नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले. उप आयुक्त आर.टी. शिंदे, राजेंद्र मुठे, नयना बोन्दार्डे उपस्थित होते. संयोजक डिफरेन्ट-स्ट्रोक्स चे पर्णल देखणे आणि लीनता देखणे होते. मिलीटरी मेडीकल कॉलेजकडून सुभेदार संजीव आणि मेजर डॉक्टर शाहीन यांच्यासह १२ जवान आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading